जम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक

सामना ऑनलाईन । जम्मू

जम्मू कश्मीर पोलिसांनी अट्टारी सीमा भागातून एका दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी अनेक दिवसांपासून फरार होता. मोहम्मद तेहसीन गुजरी असे त्या दहशतवाद्याचे नाव आहे. अद्याप याबाबत फारशी माहिती मिळालेली नाही.

पुलवामा हल्ल्यानंतर लष्कराने व पोलिसांनी जम्मू कश्मीरमध्ये शोध कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. शनिवारी गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर मोहम्मद तेहसीनला अटक करण्यात आली.