कांदा चाळीच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

5

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

राष्ट्रीय फलोत्पादन राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन २०१८ / १९ मध्ये असंख्य शेतकऱ्यांना कांदा चाळ मंजूर करण्यात आल्या. परंतु कांदाचाळीच्या जाचक अटीमुळे या योजनेकडे शेतकऱ्याने पूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

या जाचक अटी शिथील करण्यात याव्यात अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी वर्गातून होत आहे राष्ट्रीय फलोत्पादन महाराष्ट्र राज्य मंडळाच्या सहाय्याने उभारण्यात येणाऱ्या कांदा चाळसाठी ७०००० रुपये अनुदान दिले जात असले तरी या उभारण्यात येणाऱ्या कांदाचाळ साठी १८०००० रुपये प्रत्यक्षात खर्च येत आसल्या कारणाने इतका पैसा खर्च कुठून करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडत आहे. ज्याचा उद्देश फक्त शेतात कांदा साठविणे हा असला तरी हा प्रकल्प शेतकरी शेतात राबविणे बंधनकारक असल्याने त्याचा उपयोग इतर कोणत्याही कारणासाठी येत नसल्याने एवढा अवाढव्य खर्च करून अधिकारी नियमावर बोट ठेवून मिळणारे फक्त सतर हजाराचे अनुदान रोखले जात आहे. अगोदरच दुष्काळ परिस्थीती या काळात गेल्या वर्षाचेच बिले निघत नसल्याकारणाने कांदा चाळीचे बऱ्याच ठिकाणी अर्धवट कामे दिसत आहेत व या वर्षी मंजूर झालेल्या कांदा उत्पादक शेतकरी यावर्षी कांद्याचे उत्पादन वाढल्यामुळे व कांद्याचे भाव उतरल्यामुळे याचा वापर फक्त याच वर्षापूरता होईल. पूढे कांद्याचे उत्पादन कमी झाल्यास याच वापर कशासाठी करायचा अशा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या कांदा चाळीकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे.