राज्यव्यापी मापाडी परिषदेमुळे भुसार, कांदा मार्केट दोन दिवस बंद राहणार

फोटो-चंद्रकांत पालकर

सामना प्रतिनिधी । नगर 

गेल्या 3 वर्षापासून इलेक्ट्रॉनिक वजनकाटाच्या तोलईबद्दल राज्य शासनाने जाचक जी.आर.काढून गोंधळ घातलेला आहे. इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन करण्यात येणार्या पॅकबंद शेतमालावर तोलाई देऊ नये. या तत्कालीन पणन संचालक सुभाष माने यांनी काढलेला आदेश तेत्काळ मागे घ्यावा, मापाडी कामगारांना कृषी उत्पन्न बाजार समितीत कायम कामगार म्हणून सामावून घ्यावे, यासाठी 17 फेब्रुवारी रोजी हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली आणि पणन व सहकार मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री विजयकुमार देशमुख आदिंच्या उपस्थित ही परिषदे होणार आहे, अशी माहिती जिल्हा हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी दिली.

या परिषदेत सहभागी होण्यासाठी नगर जिल्हा हमाल पंचायतीच्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यां‍ची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, कॉ.बाबा आरगडे, गोविंद सांगळे, मधुकर केकाण आदिंसह हमाल-मापाडी उपस्थित होते. या परिषदेस जाण्याबाबत निर्णय घेण्यात आला. 17 व 18 फेब्रुवारी 2019 रोजी या दोन दिवशी जिल्ह्यातील भुसार व कांदा मार्केट या विभागातील तोलाई कामगार काम करतात तेथील कामकाज बंद राहणार आहे, असे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी स्पष्ट केले.