डॉ. अमर कणेकर यांचा ऑनलाइन आरोग्य अभ्यासक्रम

1

सामना प्रतिनिधी । मुंबई

अमेरिकेतील अर्कान्सिस विद्यापीठाचे समन्वयक डॉ. अमर कणेकर यांनी आरोग्य शिक्षण आणि प्रसार उपक्रमा अंतर्गत ‘हेल्थ एज्युकेशन आणि प्रमोशन’ हा ऑनलाईन आरोग्य अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सेमिनारच्या धर्तीवर ‘वेबिनार’च्या माध्यमातून ऑनलाईन अत्याधुनिक आरोग्य अभ्यासक्रम शिकता येणार आहे.

डॉ. कणेकर विद्यार्थ्यांना ‘वेबिनार’-ब्लॅकबोर्ड इनोव्हेटिव्ह सीरिज’च्या माध्यमातून शिक्षण देणार आहेत. यात सेमिनारची मालिका असेल. या ‘वेबिनार’ची सुरुवात 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील करीअरसाठी नवा मार्ग मिळणार आहे. या कोर्सबाबत अधिक माहितीसाठी Blackbord Innovative Techinng Series या वेबसाईटवर संपर्क साधता येईल. डॉ. कणेकर यांना 2017-18मध्ये आरोग्य शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून त्यांनी राबवलेल्या आरोग्य नियोजन कार्यक्रमासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. आता त्यांनी मुक्त शिक्षण क्षेत्रात सुरू केलेल्या ‘ई-हायब्रिड मॉडल’मुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नोकरीच्या ठिकाणी लागणारे कौशल्य शिकवले जाणार असल्यामुळे आरोग्य क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार होण्यास मदत होणार आहे.