पुणे विद्यापीठात विद्यार्थी शाकाहारी असेल तरच मिळेल सुवर्णपदक! 

सामना प्रतिनिधी । पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. केवळ शाकाहारी विद्यार्थ्यालाच हे सुवर्णपदक मिळेल, अशी अजब अट त्यात आहे. पत्रकात अटींची मोठी जंत्रीच देण्यात आली आहे.
पत्रकानुसार, विज्ञानेतर शाखेचा विद्यार्थीच या पदकासाठी पात्र असेल. १५ नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. विद्यार्थी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेतील प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण असावा. त्याने भारतीय व परदेशी क्रीडा स्पर्धांत जास्तीत जास्त पारितोषिके मिळवलेली असावी. त्यातही ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने करणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्य आहे.
 विद्यार्थी हिंदुस्थानी संस्कृती, आचार, विचार, परंपरा अंगीकारणारा असावा. गायन नृत्य, वक्तृत्व, नाट्य व इतर कलांत नैपुण्य असावे. रक्तदान, श्रमदान, पर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रण, साक्षरता-स्वच्छता मोहीम, एड्सविरोधी जनजागरण मोहिमेत सहभागी असावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा.
p2