राममंदिर बांधण्याची भाजपची इच्छा नाही; ओमप्रकाश राजभर यांचा आरोप

1
omprakash rajbhar

सामना ऑनलाईन । वाराणसी

उत्तर प्रदेशातील योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी सहकारी पक्ष भाजपवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. अयोध्येत राममंदिर बांधण्याची भाजपची इच्छा नसल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनीही भाजपला राममंदिराबाबत निर्माणाबाबत इशारा दिला आहे. इतर बाबींवर सरकार अध्यादेश काढू शकते, तर मग राममंदिर निर्माणाबाबत अध्योदश का काढण्यात येत नाही असा सवालही त्यांनी केला. यावरून भाजपला राममंदिर बांधण्याची इच्छा नाही, असे दिसून येत असल्याचे राजभर यांनी सांगितले.

अतिमागास वर्गाच्या 27 टक्के आरक्षणाबाबत भाजपने भूमिका स्पष्ट केली नाही तर 24 फेब्रुवारीला बनारसमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात येईल आणि 25 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशातील 80 जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्यात झालेली सपा-बसपा आघाडी मजबूत असल्याचेही त्यांनी सांगितले. या महाआघाडीमुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिल्याचे त्यांनी सांगितले. वाराणसीमध्ये होणारे प्रवासी भारतीय संमेलन आणि कुंभमेळा ही राजकीय नौटंकी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.