लोकसभेची गणितं जुळली, भाजप-जेडीयू साथ-साथ

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू यांची युती पुन्हा एकदा तुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका सुरू होती. त्याच पार्श्वभूमिवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात आज झालेल्या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप आणि जेडीयू बिहारमध्ये लोकसभेची निवडणूक एकत्रच लढणार असल्याचे सांगितले.