राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत रंगणार सिंधू – सायना यांच्यांत द्वंद्व

17
pv-sindhu-saina-nehwal


सामना ऑनलाईन । गुवाहाटी

गुवाहाटी (आसाम) येथे आजपासून रंगणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदासाठी महिला गटात पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या दोन स्टार बॅडमिंटनपटूनमध्ये अंतिम द्वंद्वं रंगण्याची दाट शक्यता आहे. या स्पर्धेत पुरुष गटातून किदाम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांनी फिटनेसच्या कारणास्तव माघार घेतल्याने या गटात पुरुष एकेरीत समीर वर्मा, बी. साईप्रणित व पारुपल्ली कश्यप यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय मानांकन लाभले आहे.महिला एकेरीत सिंधू रँकिंगमध्ये अव्वल ठरली असून सायना दुसऱ्या स्थानी आहे.

गेल्या वर्षी राष्ट्रीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू आणि सायना याच एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या. यंदाही त्याच फायनलची पुनरावृत्ती होणार असा क्रीडातज्ज्ञांचा अंदाज आहे. गेल्या स्पर्धेत सायनाने बाजी मारत जेतेपद पटकावले होते. पुरुष गटात स्टार खेळाडू श्रीकांत आणि प्रणॉय खेळणार नसल्याने बॅडमिंटन शौकिनांची काहीशी निराशा झाली आहे.

हिंदुस्थानी विमानतळ प्राधिकरणाला आंतरराज्य जेतेपद
आंतरराज्य विभागीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रतिभावान लक्ष्य सेन आणि मिश्र दुहेरीच्या श्लोक रामचंद्रन व श्रियांशी परदेशी या जोडीने चमकदार कामगिरी केल्यामुळे हिंदुस्थानी विमानतळ प्राधिकरणाने रेल्वेवर ३-२ असा विजय मिळवला. पुरुष एकेरीत लक्ष्यने शुभंकर डेवर २१-१७, २१-१७ अशी सरशी साधली.

महिला एकेरीत आईच्या आकार्शी कश्यपने अनुरा प्रभुदेसाईवर २१-१८, १७-२१, २१-१८ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. मिश्र दुहेरीच्या लढतीत श्लोक-श्रियांशी याच्या जोडीने कनिका कन्वाल व अक्षय राऊत यांना २१-९, १७-२१, २१-८ असे पराभूत केले. रेल्वेसाठी रिया मुखर्जी व अनुरा प्रभुदेसाई यांनी महिला दुहेरीत, तर कबीर कझांरकर व हेमनगेंद्र बाबू

आपली प्रतिक्रिया द्या