यॉर्कर स्पेशलिस्ट मलिंगा बनला फिरकीपटू

सामना ऑनलाईन । कोलंबो

वेगवान गोलंदाज आणि यॉर्कर स्पेशलिस्ट मलिंगाची गोलंदाजी खेळताना अनेक फलंदाजांची भंबेरी उडते. १४०-५०च्या वेगाने पायाच्या दिशेने येणारा चेंडू यष्ट्या उडवून जातो तेव्हा फलंदाज फक्त पाहातच राहतो. मात्र आपल्या गोलंदाजीने दिग्गजांना चकीत करणारा मलिंगा आता चक्क फिरकीपटूच्या रुपात दिसत आहे.

श्रीलंकेतील एका स्थानिक टी-२० सामन्यादरम्याने मलिंगाने चक्क ऑफस्पिन गोलंदाजी केली. त्याचा हा अवतार क्रिकेट प्रेमिंना नक्कीच चकीत करणारा होता. या सामन्यात मलिंगा टीजे लंका या संघाकडून सहभागी झाला होता. प्रथम गोलंदाजी करताना मलिंगाने आपल्या फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवले आणि विरोधी संघ एलबी फायनान्सचा डाव १२५ धावांत गुंडाळला. फिरकीपटू मलिंगाने या सामन्यात तीन बळी घेत शानदार कामगिरी केली.

पावसाच्या व्यत्ययामुळे मलिंगाच्या संघापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार विजयासाठी ८२ धावांचे आव्हाने देण्यात आले. हे आव्हान लिलया पार करत मलिंगाच्या टीजे लंका संघाने दणदणीत विजय मिळवला.