‘द क्विटेसेन्शीयल वुमन’ चित्रांचे प्रदर्शन

112

सामना ऑनलाईन । मुंबई

जगभरातील महिलांचा सन्मान करणारे ‘द क्विटेसेन्शीयल वुमन’ या प्रख्यात कलाकार नयना कनोडिया यांच्या चित्रांचे अनोखे कलाप्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. 2 ते 8 ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन कलाप्रेमींसाठी खुले राहणार आहे. केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. नयना कनोडिया या एक अर्थशास्त्रज्ज्ञ होत्या. त्या नंतर चित्रकार बनल्या आणि ‘आर्ट नाईफ इन इंडिया’ या समकालीन प्रकारामध्ये त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या कलाकारांसाठी हा प्रकार अनोखा मनाला जातो, पण नयना यांनी तो पूर्वीच विकसित केला होता. त्यामुळे कलाजगतात त्यांच्या कलाकृतींचा सहजपणे केला गेला. त्यांच्या कलाकृती पॅरीस येथील ‘मुसी इंटरनॅशनल डी नाईफ आर्ट’ येथे कायमस्वरूपी ठेवल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या