मनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन

96

सामना प्रतिनिधी । मुंबई

मनाची कवाडं उघडी ठेवून जगभरात भटकंती करून ती अनुभूती चित्रांच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मुंबईच्या युवा चित्रकार मिताली सुळे-वकील यांनी केले आहे. मितालीचे ‘लेबिरिंथ’ हे पहिले सोलो प्रदर्शन सध्या वरळीच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत सुरू आहे. 18 सप्टेंबरपासून सुरू झालेले हे प्रदर्शन रसिकांना 24 सप्टेंबरपर्यंत सकाळी 11 ते 7 सायंकाळी 7 या वेळेत बघता येईल.

मितालीने चित्रकलेचे कोणतेही रितसर प्रशिक्षण घेतलेले नाही. तिने लहानपणापासून चित्रकलेची आवड जोपासली आहे. आयटी कंपनीची नोकरी सोडून पूर्णवेळ तिने कलेला वाहून घेतले आहे. पुढे कलेच्या आवडीला व्यावसायिक रूपही दिले. तिने होम डेकोरेशनचा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र ‘लेबिरिंथ’ या पहिल्या प्रदर्शनापासून तिचा कलाकार म्हणून अनोखा प्रवास सुरू झाला आहे. गेल्या दीड वर्षात साकारलेली 34 पेन्सिल स्केचेच आणि ऑइल ऑन कॅनव्हास या प्रकारातील छायाचित्रे तिने प्रदर्शनात सादर केली आहेत. मितालीच्या प्रदर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी भेट दिली.

आपली प्रतिक्रिया द्या