पैशांचा पाऊस भाग ३३ – म्युचुअल फंड SIP (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन)

138
share-market

mahesh-chavan-th

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

गेल्या 2 आठवड्यांपासून म्युचुअल फंड गुंतवणुकीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी AMFI या म्युचुअल फंड असोसिशनने चांगलीच जाहिरातबाजी चालू केली आहे. एकदम सोप्या भाषेत म्युचुअल फंड गुंतवणुकीबद्दल जागरूकता पसरवण्याचे काम AMFI करत आहे. मागे एका लेखात आपण म्युचुअल फंड मधील SIP हा गुंतवणूक पद्धत पहिली. आज आपण SIP प्रमाणेच म्युचुअल फंड गुंतवणुकीतील SIPही गुंतवणूक पद्धत पाहूया.

SIP(सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) म्हणजे काय?
नावाप्रमाणेच SIP मध्ये एका MF योजनेमध्ये केलेली गुंतवणूक एक ठराविक कालावधीने म्हणजे आठवड्याला, महिन्याला, तिमाही अश्या ठरवलेल्या कालावधीमध्ये दुसऱ्या MF गुंतवणूक पर्यायांमध्ये ट्रान्सफर केली जाते. SIP या गुंतवणूक पद्धतीत जसे महिन्याला कमीतकमी 1000 रुपये आपण आपल्या बँक अकाउंट मधून MF SIP मध्ये ट्रान्सफर होतात त्याचप्रमाणे SIP मध्ये ज्यांना एकाचवेळी मोठी रक्कम गुंतवायची आहे पण त्याच वेळेला SIP प्रकारात ज्याप्रमाणे दर महिन्याला गुंतवणूक होते. त्याप्रमाणे मार्केटच्या चढ उताराचा फायदा करून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी SIP हा सर्वात योग्य गुंतवणूक पद्धत आहे. यामुळे ज्यांचे महिन्यातील उत्पन्न सतत वर-खाली होत असते अश्या गुंतवणूकदारांसाठी SIP हा योग्य गुंतवणूक पर्याय आहे.

SIP(सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) ची वैशिष्ट्ये :-
१. सुरक्षित परतावा:- MF मधील SIPचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षित परतावा. MF मधील काही योजना या सुरक्षित परतावा देणाऱ्या असतात जसे आपल्याला मुदत ठेवी किंवा बचत खात्यावर सुरक्षित व्याज मिळते त्याप्रमाणे. अश्या सुरक्षित परतावा देणाऱ्या MF योजना मध्ये गुंतवणूक करून त्यातून येणारा परतावा हा Equity MF मध्ये महिन्याला ट्रान्सफर करू शकतो. यातून 2 गोष्टी साध्य होतात तुमच्या मूळ गुंतवणुकीला धक्का लागत नाही. आणि ठराविक कालावधी मध्ये Equity MF मध्ये ट्रान्सफर केला जातो त्यामुळे नेहमीच्या पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा मिळतो.
उदाहरण: १० लाख रुपये २५ वर्षासाठी मुदत ठेवी मध्ये ८% ने रक्कम ६२ लाख रुपये होतात तर हीच रक्कम MF SIPमध्ये गुंतवणूक केली तर त्यामधील रक्कम जवळपास १.५० पर्यंत जाऊ शकतो. कारण मूळ १० लाख वर मिळणारे ८% Equity MF ट्रान्सफर केल्यामुळे त्यावर मिळणारे १५% जरी परतावा मिळाला तर सरासरी ११.५०% परतावा होतो आणि तुम्ही यामधून थोडयाशा जोखिमेवर पारंपरिक गुंतवणुकीला मागे टाकू शकता.

२.Averaging of Cost (सरासरी मूल्य) :- SIP प्रमाणेच SIPमध्ये ही ठराविक कालावधी ने गुंतवणूक होते जेणेकरून मार्केट च्या चढ उतयारानुसार प्रत्येक स्तरावर गुंतवणूक करण्यास मदत करते.

SIP करताना महत्वाच्या मुख्य 3 पायऱ्या:-
SIP करताना खालील ३ पायऱ्या खूप महत्वाच्या आहेत कोणत्याही SIP योजनेमध्ये गुंतवणुक करताना या पायऱ्या तुम्ही तपासून घ्या.
१. मुख्य योजना:- एकदा का तुम्ही SIP करण्याचा निर्णय घेतलात तर मुख्य योजना आर्थिक नियोजनकारच्या मदतीने निवडा.
२. ठराविक कालावधी नंतर रक्कम ट्रान्सफर होणारी योजना:- ज्याप्रमाणे आपण SIP निवडतो त्यानुसार SIPच्या मुख्य योजनेतून ट्रान्सफर होणारी रक्कम कोणत्या योजनेत ट्रान्सफर करायची आहे ते ठरवणे.
३.रक्कम आणि कालावधी:-
योजना निवडल्यानंतर सर्वात महत्वाची पायरी म्हणजे
#मूळ रक्कम ठरवणे
#ट्रान्सफर होणारी रक्कम ठरवणे
#कालावधी ठरवणे
वरील ३ पायऱ्यांची जर योग्य काळजी घेतलीत तर म्युचुअल फंड गुंतवणुकीतील हा सुंदर गुंतवणूक पद्धतीतून तुम्ही आपल्या महत्त्वाच्या आर्थिक ध्येयाना जिथे आपण जास्त ध्येय जोखीम घेऊ शकत नाही पण ते पूर्ण करणे आपली जबाबदारी आहेत त्या पूर्ण करू शकतो. पारंपरिक गुंतवणूक पर्याय मधून आज बाहेर पडण्याची वेळ आली आहे आणि नवनवीन गुंतवणूक पर्यायाबद्दल अभ्यास करणे आणि आपल्या आर्थिक ध्येयासाठी कोणते पर्याय योग्य आहेत ते पाहणे आज गरजेचं आहे. कारण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी “म्युचुअल फंड सही है….!”

आपली प्रतिक्रिया द्या