पाकड्यांनी थोपटली दहशतवाद्याची पाठ; स्वातंत्र्यसैनिक असल्याचा दावा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे सर्व देश दुःखात बुडाला आहे, सर्व स्तरातून हल्ल्याचा निषेध व्यक्त करत पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त होत आहे. जगभरातूनही या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी आत्मघाती दहशतवाद्याची पाठ थोपटून तो स्वातंत्र्यसैनिक असल्याचा दावा केला आहे. तसेच या प्रकरणी सारवासारव करत या हल्ल्याशी जैश ए मोहम्मदचा संबंध नसल्याचा कागांवाही प्रसारमाध्यमांनी केला आहे. जैश ए मोहम्मदने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असताना पाकड्या प्रसारमाध्यमांनी हा कांगावा केला आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द नेशन’ ने फ्रीडम फायटरने किया अॅटक या शीर्षकाने दहशतवादी हल्ल्याचे वृत्त प्रकाशित केले आहे. तसेच वृत्तपत्राने जैशच्या एका प्रवक्त्याचा हवाला देत या हल्ल्याशी जैश ए मोहम्मदचा संबंध नसल्याचा दावाही केला आहे. जैश ए मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद डारने हा हल्ला घडवला होता. जगभारतून हल्ल्याचा निषेध होत असताना पाकिस्तानी प्रसारमाध्यमे दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करत असून दहशतवाद्यांच्या समर्थनासाठी पुढे आली आहेत.