कोंबडीवर लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलाला अटक

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानमधील पंजाब प्रातात एका अल्पवयीन मुलाला एका कोंबडीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. लाहोरपासून २०० किलोमीटर असणाऱ्या हफीजाबादमध्ये हा प्रकार घडला आहे.

कोंबडीचा मालक मंसब अली यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ११ नोव्हेंबरला जलालपूर भट्टीजवळ राहणाऱ्या अन्सार हुसेन या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने कोंबडीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केले. कोंबडीच्या मालकाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.

अल्पवयीन तरुणाने मादक पदार्थांचे सेवन केल्यानंतर हा कारनामा केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस अधिकारी सरफराज अंजुम यांनी ‘द एक्सपिरेस्ट ट्रिब्यून’ला ही माहिती दिली आहे. दरम्यान, हुसेनने आपला गुन्हा कबुल केला आहे.