लंडनमध्ये पाकड्यांची हुल्लडबाजी, सौरव गांगुलीला घेरले

43

सामना ऑनलाईन। लंडन

हिंदुस्थानचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या गाडीला घेरुन पाकड्यांनी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा करत हुल्लडबाजी केल्याची घटना समोर आली आहे. लंडनमध्ये हिंदुस्थान पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम लढत सुरु आहे. याचदरम्यान ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी नागरिकांच्या या गोंधळाकडे गांगुलीने स्मितहास्य करत दुर्लक्ष केले व गर्दीतून मार्ग काढला . या घटनेचा व्हिडिओ सोशल साईटवर व्हायरल झाला आहे.

आय सपोर्ट नरेंद्र मोदी नामक फेसबुक पेजवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. तसेच पाकिस्तानी प्रेक्षकांनी गांगुलीली घेरले, पाकिस्तानच्या झेंड्याने त्याची गाडी साफ केली, भारत माता की जय असेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानी प्रेक्षकांच्या या हुल्लडबाजीवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर काहीजणांनी कुठल्याही देशाच्या राष्ट्रध्वजाचे सन्मान राखायलाच हवा असे म्हटले आहे. तर काहीजणांनी गांगुलीच्या गाडीवर पडलेला झेंडा बघून पाकिस्तानचा झेंडा गाडी स्वच्छ करण्यासाठी उपयोगी आल्याचे म्हटले आहे.

पाहा व्हिडिओ-

आपली प्रतिक्रिया द्या