Pulwama Attack ‘आयएसआय’ची भूमिका मोठी, अमेरिकन तज्ञांना संशय

terrorist-attack-pulwama

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असली तरी त्या हल्ल्यामागे पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तचर संघटनेने मोठी भूमिका बजावली असल्याचा दाट संशय दक्षिण आशियातील अमेरिकन तज्ञांनी व्यक्त केला आहे.

पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’ ही दहशतवादी संघटना कश्मीरमध्ये कार्यरत आहे. हे पुलवामाच्या भयंकर दहशतवादी हल्ल्याने अधोरेखित केले आहे. ती संघटना हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढविण्यासाठी यापुढेही दहशतवादी कारवाया करीत राहील हे स्पष्ट झाले आहे. -अनीश गोयल, माजी उच्चपदस्थ अधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा परिषद, अमेरिका

पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यामुळे ‘जैश’सारख्या संघटनांचा बीमोड करण्यासाठी पाकिस्तानचे मन वळवण्यात अमेरिकेच्या आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रयत्नाच्या मर्यादाच स्पष्ट झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय समुदाय आणखी काय करू शकतो, हाच प्रश्न आता उभा राहिला आहे.- अलायसा आयरेस, कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन, अमेरिका.

पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ‘जैश-ए-मोहम्मद’ने लगेचच स्वीकारली. त्यातून त्या हल्ल्याच्या सूत्रधारांना पाकिस्तानची ‘आयएसआय’ ही गुप्तचर संघटना देत असलेल्या पाठबळाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्या दहशतवादी हल्ल्याच्या पाऊलखुणा पाकिस्तानात असल्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारपुढे सर्वात मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
– बुस रिडेल, माजी विश्लेषक सीआयए, अमेरिका