पत्रकार डॅनियल पर्लची हत्या करणाऱयांना अटक

1

सामना ऑनलाईन। पेशावर

अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल याचे अपहरण आणि हत्या केल्याप्रकरणी तालिबानच्या दोघा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पर्लबरोबर इतर दहशतवादी घटनांमध्येही त्यांचा हात होता, असे खैबर पशतुन्हातील दहशतवादविरोधी पथकाने स्पष्ट केले.

पाकिस्तानमधील तेहरिक ए तालिबान या दहशतवादी संघटनेचे हे दहशतवादी आहेत. अझीम जान आणि मोहम्मद अन्वर अशी त्यांची नावे असून 2002मध्ये पर्ल याच्या अपहरण आणि हत्येत त्यांचा हात होता. पर्ल हे अमेरिकेच्या ‘द वॉल स्टिट जर्नल’ या वर्तमानपत्राचे दक्षिण आशियाचे प्रमुख होते.