मोदी जनतेला म्हणाले अभिनंदन, पाकड्यांना वाटलं विंग कमांडर ‘अभिनंदन’; झाले ट्रोल

119

सामना ऑनलाईन । मुंबई

पाकिस्तानच्या हद्दीत घुसत त्यांचंच विमान पाडून सुखरूप परतलेले विंग कमांडर अभिनंदन यांचा पाकड्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. कारण, पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलच्या निवेदकाने निवडणुकांनंतरच्या अभिनंदन या शब्दाचा अर्थ विंग कमांडर अभिनंदन असा लावला आहे. त्यामुळे या नेटकऱ्यांनी या न्यूज चॅनेलसह पाकिस्तानला ट्रोल केलं आहे.

लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देशाच्या मतदाराने भरघोस मतदान करत एनडीएला विजयी केलं. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भाषण करताना देशाच्या जनतेचे आभार मानत ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी अभिनंदन केलं. एआरवाय नावाच्या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने या भाषणाच्या व्हिडीओचं वार्तांकन केलं. मात्र, त्यांना अभिनंदन या शब्दाचा अर्थ कळलाच नाही. वृत्तनिवेदकाने अभिनंदन या शब्दाचा अर्थ विंग कमांडर अभिनंदन असा घेतला आणि मोदींवर टीका केली. पण, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जे व्हायचं तेच झालं.

नेटकऱ्यांनी वृत्तवाहिनीला तर ट्रोल केलंच पण पाकड्यांचीही अक्कल काढायला सुरुवात केली. अभिनंदन या शब्दाचा अर्थ शुभेच्छा असा होतो, असं म्हणत पाकिस्तानला मोदीफोबिया किंवा अभिनंदनफोबिया झाल्याचंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर काहींनी वृत्तनिवेदक आणि वाहिनीला अडाणी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या