अयोध्या प्रकरण चिघळत ठेवण्यासाठी पाकिस्तान पैसा पुरवतो – वक्फ बोर्ड

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

राम जन्मभूमी वाद चिघळत ठेवण्यासाठी पाकिस्तान मौलवींना पैसे पुरवत आहे. असा गौप्यस्फोट उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सैय्यद वसीम रिजवी यांनी केला आहे. हिंदू व मुसलमान यांच्यात तणाव निर्माण करुन हिंदुस्थानामध्ये अस्थिरता पसरवणे हा पाकिस्तानचा मूळ हेतू असल्याचही रिजवी यांनी म्हटल आहे.

तसेच मुसलमानांनी राम जन्मभूमीवरील अयोध्येतील ‘त्या’ जमिनीपासून दूर राहावे असेही ते म्हणाले. राम जन्मभूमीवरील अयोध्येतील ‘त्या’ जमिनीवर श्रीरामाचे मंदिर बांधण्यात यावे, तसेच मंदिरापासून काही अंतरावर मुस्लिमबहुल भागात मशीद उभारण्यात यावी, असे प्रतिज्ञापत्र ऑगस्ट मध्ये वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले आहे. बाबरी मशीद बाबरने नाही तर मीर बांकीने उभारली होती. जमिनीवरील एकतृतीयांश हिस्सा शिया बोर्डाला मिळावा अशी मागणीही प्रतिज्ञापत्रात करण्यात आली होती. पण यावर सुन्नी वक्फ बोर्डने आक्षेप घेतला आहे.

बाबरी मशीद बाबरने नाही तर हुजाब्बार अली ऊर्फ मीर बांकीने उभारली होती. मुघल बादशाह बाबरच्या सैन्याचा कमांडर मीर बांकी होता. अयोध्येपासून १० कि. मी.वर शहानवान गावात आजही मीर बांकीची मजार आहे. मीर बांकी शिया होता. मशिदीचा बाबरशी संबंध नाही. १९४६ पर्यंत शिया वक्फ बोर्डाकडेच मशिदीचा ताबा होता, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.