पाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार

32

सामना ऑनालाईन । मुंबई

स्वातंत्र्यापासून झालेल्या युध्दात नेहमी पाकिस्तानने हिंदुस्थानसमोर कच खाल्ली आहे. मग ते 1947 चे असो, 1965 चे असो, 1971 चे बांग्लादेश मुक्ती किंवा 1999 चे कारगिल युद्ध असो. प्रत्येक वेळी पाकिस्तानने हिंदुस्थानपुढे नांगी टाकली आहे. आपली कुवत ठाऊक असूनही पाकिस्तानने आपल्या बेटकुळ्या फुलवल्या आहेत. शनिवारी हिंदुस्थानी लष्कर प्रमुख रावत यांनी पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे म्हटले होते. त्यावर पाकिस्तानने आम्हीही युद्धाला तयार असल्याचा फुशारक्या मारल्या आहेत.

पाकिस्तानी सैन्याचे जनसंपर्क विभागाचे प्रमुख डीजी मेजर जनरल आसिफ गफूर यांनी शनिवारी एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखात देताना म्हटले की “आम्ही युद्धाला तयार आहोत आणि युद्ध तेव्हा होते जेव्हा दुसरा पक्ष युद्धासाठी तयार नसतो.” तसेच पाकिस्तानला शांतता हवी आहे याचा अर्थ आपण कमजोर नसल्याचेही त्यांनी संगितले. तसेच रावत यांचे वक्त्यव्य बेजाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले.

आज पाकिस्तानच्या तिजोरीत खडखडाट आहे, त्यामुळे पंतप्रधानांच्या ताफ्यातील त्यांना 34 गाड्या आणि 8 म्हशींचा लिलावही करण्यात आला होता.  बहुतांश रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सोयीसाठी हिंदुस्थानकडे याचना करावी लागते, काही कार्यक्रमांत लोक झुंडींनी बिर्याणीवर ताव मारतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. अशी परिस्थिती असतानाही पाकिस्तान युद्धाला तयार असल्याच्या बेडकुळ्या फुगवत दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या