पाकिस्तान म्हणतोय, हिंदुस्थानला ‘गुड न्यूज’ देऊ!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या दया अर्जावरील सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. हिंदुस्थानने आता ‘गुड न्यूज’ मिळण्याची अपेक्षा बाळगावी असे पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपाखाली दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर जाधव यांनी दया अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणावर पत्रकारांनी छेडले असता गफूर म्हणाले की, हिंदुस्थानला आम्ही लवकरच ‘गुड न्यूज’ देऊ.