पाकिस्तान एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये राहणार

imran khan

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

जगभरातील दहशतवाद्यांना होणारे अर्थसहाय्य रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) स्थापन केलेला आहे. दहशतवादाला पोसल्याबद्दल पाकिस्तान एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये सध्या आहे. आता पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदने पुलवामा हल्ला केल्याने पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी हिंदुस्थानने एफएटीएफकडे केली. परंतु एफएटीएफने ही मागणी तूर्त मागणी मान्य केली नाही. मात्र यापूर्वी दहशतवादाला मदत केल्याप्रकरणी पाकिस्तान एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार आहे.