चीन देणार पाकिस्तानला दोन अब्ज डॉलर्सचे कर्ज

1

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

सध्या आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानला मित्र चीनकडून मोठी आर्थिक मदत सोमवारपर्यंत मिळणार आहे. 2 अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढे कर्ज चीन पाकला देणार आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या वित्त मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे.2.1 अब्ज अमेरिकी डॉलर्स (15 अब्ज यूआन) एवढे कर्ज चिनी सरकारकडून देण्याच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.

सोमवारपर्यंत हे सर्व कर्ज स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या खात्यात जमा होतील, असे पाकच्या वित्त विभागाचे प्रवक्ते खकान नजीब खान यांनी सांगितले. पाकिस्तानकडे असलेले परकीय चलन कमी झाल्याने यापूर्वी पाकला सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीकडून प्रत्येकी एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचे अर्थसहाय्य मिळालेले आहे.