कसोटी क्रिकेटमधील 82 वर्षापूर्वीचा विक्रम शाहने तोडला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

क्रिकेटमध्ये कोणताही विक्रम हा शास्वस नसतो असे म्हटले जाते. याचाच प्रत्येय पाकिस्तान आणि न्यूझीलंड सामन्यादरम्यान आला. पाकिस्तानचा लेग स्पिनर यासिर शाह याने कसोटी क्रिकेटमधील 82 वर्ष अबाधित असलेला विक्रम मोडीत काढला.

यासिर शाह याने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 200 बळी पूर्ण करण्याचा विक्रम केला. या सामन्यात यासिरने विल समरविले याला बाद करताच त्याच्या नावावर हा विक्रम जमा झाला. यासिरने फक्त 33 व्या कसोटीत हा टप्पा गाठला. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचे लेग स्पिनर क्लेरी ग्रिमट यांच्या नावावर होता. ग्रिमट यांनी 1936 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना 36 कसोटीत हा टप्पा गाठत विक्रम केला होता. या यादीत तिसऱ्या स्थानावर टीम इंडियाचा अश्विन असून त्याने हा टप्पा 37 व्या कसोटीत गाठला होता.

सर्वात वेगवान 200 बळी घेणारे खेळाडू –

  • यासिर शाह – 33 कसोटी
    क्लेरी ग्रिमट – 36 कसोटी
    आर. अश्विन – 37 कसोटी