बारामुल्लातून पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक

1

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधून पोलिसांनी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. मोहम्मद वकार असे त्या दहशतवाद्याचे नाव असून तो गेल्या दीड वर्षांपासून बारामुल्ला व आजुबाजुच्या भागातील तरुणांचे हिंदुस्थानविरोधात ब्रेनवॉश करण्याचे काम करत होता. बारामुल्ला हा दहशतवादी कारवायांपासून मुक्त झालेला जिल्हा आहे. त्यामुळे वकार हा बारामुल्लात पुन्हा दहशतवादी कारवाया घडविण्याच्या प्रय़त्नात होता.

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील मिआनवाई भागात राहणारा वकार हा जुलै 2017 ला हिंदुस्थानात आला. तेव्हापासून तो तेथील तरुणांचे ब्रेन वॉश करून त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सामिल करून घेण्यासाठी प्रयत्न करत होता. तो गेल्या काही महिन्यांपासून गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता.