पालक पत्ता चाट

सामना ऑनलाईन । मुंबई

पालक पत्ता चाट हा फटाफट बनणारा पदार्थ आहे. पावसाळी ऋतुत खमंग आहारासोबत पालकामुळे तुमच्या आरोग्यालाही ती फायदेशीर ठरेल.

साहित्य-
पालकची पाने, १ मोठी वाटी बेसन, १ चमचा लाल तिखट, १ चमचा ओवा, १ चमचा हळद, पाणी, तेल आणि चवीपुरते मीठ

गार्निशिंगसाठी- बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक शेव, खारी बुंदी, दही, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, डाळिंबाचे दाणे.

कृती-
प्रथम एका मोठ्या भांड्यात १ मोठी वाटी बेसनाचं पीठ घ्या. त्यात लाल तिखट, ओवा, मीठ घाला आणि पाणी ओतून त्याचं जाडसर मिश्रण बनवा. त्यात पालकची पाने पाण्याने स्वच्छ धुवून त्यांना तयार केलेल्या मिश्रणात टाकून त्याला तेलात तळून घ्या. तळून घेताना गॅस मोठ्या आचेवर ठेवावा. जवळपास दोन मिनिटात पालकांची पाने तळून होतात.

तळताना पालकाची पाने दोन्ही बाजूनी तळली जातील याची काळजी घ्यावी. तळून झाल्यावर पालकचे भजी एका प्लेटमध्ये काढावेत. त्यावर थोडी लाल तिखट, चवीनुसार मीठ, फेटलेले दही, हिरवी चटणी, चिंचेची चटणी घालून त्यावर डाळिंबाचे दाणे बारीक चिरलेला टोमॅटो आणि पिवळी शेव टाकून बुंदी टाकावी आणि सर्व्ह करा पालक पत्ता चाट.