पल्लवी विचारतेय, कौन है…!

अभिनेत्री पल्लवी सुभाष आता कलर्स वाहिनीवरील ‘कौन है’ या भीतीदायक मालिकेत आपल्याला घाबरवायला येणार आहे. माँ असे कथेचे नाव असून त्यामध्ये पल्लवीसोबत अभिनेत्री लिली पटेल दिसणार आहेत. ही कथा जमशेदपूरची असून एक तरुण जोडपे, म्हातारी आई आणि दोन मुले यांच्याभोवती फिरणारी आहे. नवीन घरात त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीला काहीतरी दिसतं. सुरुवातीला तिचे आईवडील विश्वास ठेवत नाहीत. त्या मुलीला तो आत्मा त्रास देऊ लागतो. तिला वाचवण्यासाठी आईवडिलांचे प्रयत्न सुरू होतात. भूत, आत्मा अशी मालिकेची संकल्पना आहे. याविषयी पल्लवी म्हणते, मला भयपट आवडतात. खूप दिवसांपासून अशा भूताखेताच्या मालिकेत वा चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. कौन है या मालिकेतून ती पूर्ण झाली आहे.  कलर्स वाहिनीवर दर आठवडय़ाला शुक्रवार ते रविवार रात्री १०.३० वाजता ही मालिका प्रेक्षक बघू शकतात.