पं. जसराज यांचे सुश्राव्य गायन गुरुवारी

पं. जसराज मेवाती घराण्याचे गायक. त्यामुळे शास्त्रीय संगीत असो की भक्तीगीत… त्यांच्या गायनात रसिक डुंबायला लागतात. त्यांच्या मधुर स्वरांचा आस्काद रसिकांना आज गुरूवारी एनसीपीएच्या लिटील थिएटरमध्ये सायंकाळी 6.30 वाजता घेता येणार आहे.

गुरुवारी होणाऱ्या 120 मिनिटांच्या कार्यक्रमात ते चार राग घेणार आहेत. यात जोग, मालकंस, कलावती आणि मियां मल्हार या रागांचा समावेश आहे. त्यानंतर ते दोन भजनं सादर करणार आहेत. पं. जसराज हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक मोठे नाव. प्रारंभी वडील मोतीराम यांच्याकडून, तर नंतर आपले मोठे बंधू मणिराम यांच्या कठोर तालमीतून त्यांचे स्वर आणि सूर ताकून सुलाखून निघाले आहेत. दूरदर्शन आर्चिव्ह यांची प्रस्तुती असलेला हा कार्यक्रम विनामूल्य आहे. मात्र प्रथम येणारांना प्रथम सीट्स दिल्या जाणार आहेत. त्यामुळे 6.20 पर्यंत आपली जागा नक्की करा असे आवाहन एनसीपीएतर्फे करण्यात आले आहे.