Recipe – पनीर पराठा

साहित्य : गव्हाचं पीठ 300 ग्रॅम, पनीर 200 ग्रॅम, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 इंच आल्याचा तुकडा, चिरलेली कोथिंबीर, एक छोटा चमचा धणे पावडर, पाऊण चमचा तिखट, चवीनुसार मीठ आणि तेल किंवा तूप.

कृती : सर्वप्रथम गव्हाच्या कणिकेत थोडंसं मीठ आणि 2 छोटे चमचे तेल घालून कणिक मळून घ्या. कोमट पाण्याने कणिक मळून घ्या. पनीरमध्ये हिरवी मिरची, धणे पूड, कोथिंबीर, आलं, तिखट आणि मीठ घाला. पनीरचे हे सारण कणकेच्या गोळ्यात घालून पोळी लाटायची आहे. त्यासाठी गॅसवर तवा ठेवा. मळलेल्या पिठाचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्यामध्ये पनीरचे सारण भरा. गोळा सर्व बाजूंनी बंद करा आणि पोळपाटावर पोळीसारखे गोल लाटा आणि गरम तव्यावर तूप किंवा तेल घालून खमंग पोळीसारखे भाजून घ्या. हा गरमागरम पराठा रायता, चटणी, बटाटा-फ्लॉवरची भाजी किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता.