‘स्त्री’मधील ‘आधार लिंक’चा डॉयलॉग स्क्रीप्टमध्ये नव्हताच!

pankaj-tripathi-stree

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

राजकुमार राव दिग्दर्शित ‘स्त्री’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या भूमिका धम्माल झाल्या असून ‘सबका आधार लिंक है उसके पास’, हा पंकज त्रिपाठीच्या तोंडचा डायलॉग तुफान हिट झाला आहे. विशेष म्हणजे हा डायलॉग मुळ स्क्रीप्टचा भाग नसून तो पंकज त्रिपाठी यांनीच अचानक म्हटलेला आहे.

चित्रपटाच्या एका दृश्यामध्ये एक गावकरी पंकज यांना विचारतो की, या चेटकीणीला (चुड़ैल) सर्व गावकऱ्यांची नावं कशी काय माहीत? त्यावर पंकज म्हणतात, ‘सबका आधार लिंक है उसके पास’. या डायलॉगवर सारे प्रेक्षक पोटधरून हसतात. गेल्या तीन-चार वर्षात देशात आधार लिंक करण्यावरून वादविवाद सुरू असतात. त्याचाच वापर पंकज त्रिपाठी यांनी चलखीने करत प्रेक्षकांना आपलंस करून घेतलं आहे. त्यांची संवाद फेक प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

यावर बोलताना पंकज त्रिपाठी यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ‘मला मिळालेली भूमिका चांगल्यापद्धतीनं वठवण्याचा मी प्रयत्न करतो’, असं ते म्हणाले.

summary: pankaj tripathi wrote aadhar link dialogue