परळीत विजयी जल्लोष; मुंडे भगिनींनी पतीसह डीजेच्या तालावर धरला ठेका

293

सामना प्रतिनिधी । बीड

बीड लोकसभा मतदार संघातून 25 व्या मतमोजणी फेरी अखेर डॉ. प्रीतमताई गोपीनाथ मुंडे यांना 1 लाख 53 हजार मतांची आघाडी मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्ष, शिवसेना व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी परळी येथील यशश्री बंगल्यावर एकच जल्लोष केला. यावेळी मुंडे भगिनींनी पतीसह डीजेच्या तालावर धरला ठेका धरला

पालकमंत्री पंकजा मुंडे, डॉ. अमित पालवे, उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे व त्यांचे पती गौरव खाडे हे स्वतः कार्यकर्त्यांच्या आनंदोत्सवात सामील झाले. एवढेच नव्हे तर या सर्व कुटुंबाने गुलालाची उधळण करत डीजेच्या तालावर ठेका धरला. या प्रसंगाने कार्यकर्त्यांच्या जल्लोषात अधिकच भर पडली. या भरीत भर म्हणून डॉ. अमित पालवे यांचा डान्स विशेष आकर्षणाचा विषय ठरला. डॉ. प्रीतमयांच्या विजयाने पंकजा मुंडे यांचे नेतृत्व पुन्हा एकदा झळाळून निघाले.

आपली प्रतिक्रिया द्या