रिषभ पंतला पाच कोटींची लॉटरी

rishabh-pant-money

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बीसीसीआयने आपल्या वार्षिक कंत्राटात 25 क्रिकेटपटूंची श्रेणीवार यादी आज घोषित केली. या यादीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱयात धडाकेबाज खेळ करीत कसोटी शतक झळकावणाऱया 21 वर्षीय रिषभ पंतला थेट ‘अ’ श्रेणीत प्रमोट करण्यात आले आहे. तर अनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांची ‘अ +’ श्रेणीतून ‘अ’ श्रेणीत घसरगुंडी झाली आहे. टॉपच्या ‘अ +’ श्रेणीत फक्त टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, ‘हिट मॅन’ रोहित शर्मा आणि ‘डेथ ओव्हर्सचा बादशहा’ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या तिघांच्याच नावांचा समावेश करण्यात आला आहे.

… म्हणून शंकर, मयांक, पृथ्वी यांचा विचार नाही

बोर्डाच्या निकषानुसार वार्षिक करारात येणाऱया क्रिकेटपटूने किमान 3 कसोटी अथवा 8 वन डे लढतीत देशाचे प्रतिनिधित्व करायला हवे. या निकषामुळे चमकदार कामगिरी करूनही पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल आणि विजय शंकर या युवा क्रिकेटपटूंना करारात स्थान दिले नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.

यंदाच्या बीसीसीआय करारात स्थान मिळवणारे खेळाडू

‘अ +’ श्रेणी (7 कोटी रुपये) : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह.

‘अ’ श्रेणी (5 कोटी रुपये) : महेंद्रसिंग धोनी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे.

‘ब’ श्रेणी (3 कोटी रुपये) : के.एल. राहुल, हार्दिक पांडय़ा, उमेश यादव, युजवेंद्र चहल.

‘क’ श्रेणी (1 कोटी रुपये ) : केदार जाधव, दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू, मनीष पांडे, हनुमा बिहारी, खलील अहमद आणि वृद्धिमान सहा.