…ही शर्यत रे आपुली! पंत, शंकर, रहाणेही विश्वचषकासाठी दावेदार

8


सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे नगारे वाजायला सुरुवात झाली आहे. इंग्लंडमध्ये 30 मेपासून या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा शंखनाद होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच देशांनी आपापल्या संघाची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. हिंदुस्थानमध्ये प्रतिभावान क्रिकेटपटूंची कमतरता नसल्याने ‘टीम इंडिया’त स्थान मिळविण्यासाठी सध्या चुरशीची शर्यत रंगली आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेसाठी कोणत्या 15 खेळाडूंना निवडायचे हे कोडे सोडविताना संघनिवड समितीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यातच ‘टीम इंडिया’च्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी विश्वचषक स्पर्धेसाठी रिषभ पंत, विजय शंकर या नव्या दमाच्या क्रिकेटपटूंसह अजिंक्य रहाणेही शर्यतीत असल्याचे सांगून वरिष्ठ खेळाडूंना एकप्रकारे इशाराच दिला आहे.

एमएसके प्रसाद यांनी ‘टीम इंडिया’तील एकएका स्थानासाठी मोठी चुरस असल्याचे सांगितले. ते म्हणाले, रिषभ पंतने वर्षभरात प्रचंड मेहनत घेतली असून तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे.

नव्या दमाच्या विजय शंकरबाबत बोलताना एमएसके प्रसाद म्हणाले, कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत विजय शंकर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने केवळ गोलंदाजीच नक्हे तर फलंदाजीतही स्वतःची क्षमता सिद्ध केली. न्यूझीलंडविरूद्धच्या त्याच्या खेळीनंतर चौथा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघनिवड समिती त्याचा विचार करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या