अंबरनाथजवळ पेंटाग्राफ तुटला; मध्य रेल्वे विस्कळीत

सामना ऑनलाईन । अंबरनाथ

पावसामुळे सकाळपासून विस्कळीत असलेली मध्य रेल्वे हळू-हळू पूर्वपदावर येत होती. मात्र अंबरनाथजवळ एका लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कर्जतहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाकडे (सीएसएमटी) जात असलेली वाहतूक पुरती विस्कळीत झाली.

दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास पेंटाग्राफ तुटल्याची घटना घडली. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली. पेंटाग्राफ तुटल्यामुळे ३ प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. कर्जतहून सीएसएमटीकडे जात असलेल्या लोकलचा पेंटाग्राफ अंबरनाथजवळ तुटल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.