परळीत राम कदमांची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

सामना प्रतिनिधी । परळी

आपल्या वादग्रस्त वक्तव्यातून समस्त महिला वर्गाचा अपमान करणाऱ्या भाजपाचे आमदार राम कदम यांचा परळी शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. एका गाढवाच्या गळयात त्यांचा फोटो अडकवून परळीत प्रतिकात्मक धिंड काढण्यात आली.

शहरातल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात महिलांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे आमदार राम कदम यांचा परळी शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. एका गाढवाच्या गळयात कदम यांचा प्रतिकात्मक फोटो अडकवून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश विभुते, युवा सेना तालुका प्रमुख वेंकटेश शिंदे, शिवसेना माजी नगराध्यक्ष अभय कुमार ठक्कर, माजी उपनगराध्यक्ष राजा भैय्या पांडे, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अतुल दुबे, अभिजित धाकपाडे, संतोष चौधरी, कृष्णा सुरवसे, अतुल शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.