डाळ तांदळाचे पराठे

साहित्य : शिजवलेली डाळ आणि शिजवलेला भात प्रत्येकी १ मोठी वाटी, कणिक २ मोठय़ा वाटय़ा, मीठ अर्धा चमचा किंवा चवीनुसार, जिरे अर्धा चमचा, तेल किंवा तूप पराठय़ांसाठी.

कृती : सर्वप्रथम कणीक चाळून घ्यावे आणि ते एखाद्या मोठय़ा भांडय़ात काढून ठेवावे. नंतर त्यात मीठ, जिरे आणि एक छोटा चमचा तेल घाला. त्यानंतर डाळ आणि भात एकत्र करून आवश्यकतेनुसार त्यात पाणी घालून पराठय़ांसाठी कणीक मळून घ्या. हे  कणीक किमान २० मिनिटे झाकून ठेवायचे. त्यानंतर ते नीट मळून घ्यावे. मग गॅसवर तवा गरम करा. कणीकमधील थोडे पीठ घेऊन गोल करून त्यात डाळ आणि भाताचे मिश्रण घाला. गोल बंद करून लाटण्याने हा गोळा लाटून घ्या. वाटल्यास तेलही लावता येईल. हे पराठे गॅसवरील तव्यावर खरपूस भाजून घ्या. ते भाजताना त्याखाली तेलही सोडावे लागेल. उलटून पलटून पराठा नीट भाजायला हवा. दही, लोणचे किंवा चटणीसोबत किंवा आपल्या आवडत्या भाजीसोबतही हे पराठे छान लागतात.