परभणी मनपा सफाई कामगाराबाबत उदासीन,कर्मचारी संघटनांचा आरोप

सामना ऑनलाईन, परभणी

परभणी महानगर पालिकेमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांना शासनाने मंजूर केलेल्या सोई-सुविधा मिळत नसल्याचा आरोप सफाई कर्मचारी संघटनांनी केला आहे. या कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर न मिळणे, लाड/पागे कमिटीच्या शिफारशी स्वीकारलेल्या असून त्यांची अंमलबजावणी न करणे या आपल्या मुख्य मागण्या असल्याचं संघटनेच्या नेत्यांनी म्हटले आहे.

सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामोजी पवार यांनी परभणी मनपाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला पुण्याचे अ‍ॅड.कबीर दिवाण व नरोत्तम चव्हाण उपस्थित होते. मनपाचे आयुक्त राहुल रेखावार कामगार धोरणांच्या बाबतीत उदासीन असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.