शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारात पालकांची लगबग

30

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

शाळा सुरु होण्यास थोडेच दिवस राहिल्याने उरण शहरातील बाजारपेठांमध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची लगबग सुरु झाली आहे .जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा सुरु होणार असल्याने शालेय साहित्य खरेदीला सुरुवात झाली आहे. बच्चे कंपनीला आकर्षित करील, असे विविध प्रकारचे शालेय साहित्य सध्या बाजारात उपलब्ध आहे.

शिवा, मोटू पतलू, छोटा भिम, बार्बी, अंग्री बर्डस ,बेन्तेन यांच्यासह स्पायडरमॅन, सुपर हिरोजचे चित्र असलेल्या स्कूल बॅग्स बाजारात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वह्या, पुस्तके, गणवेश, बूट, टाय,पेन, पेन्सिल, वॉटर बॉटल, छत्री, रेनकोटच्या खरेदीला देखील सुरुवात झाली आहे. 12 जूनपासून ही गर्दी आणखी वाढेल, असा विश्वास विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे. किमती आवाक्यात असल्याने बच्चे कंपनीकडून स्कूलबॅग, नोटबुक, कंपासपेटी यांच्या खरेदीसोबत वॉटरबॅग, टिफिन बॉक्स, छत्री,रेनकोटला अधिक मागणी आहे. स्कूल बॅग्स च्या अनेक प्रकार उपलब्ध आहेत त्यात स्काय बॅग ,सफारी ,आर्टिक फॉक्स ,व सर्व प्रकारच्या ब्रॅन्डेड बॅगा त्याच प्रमाणे स्टील वाटर बॉटल, स्टील लंच बॉक्स ,कंपास बॉक्स आदी बाजारात उपलब्ध आहेत ,तसेच सर्व प्रकारच्या ब्रान्डेड छत्रांची मागणी ग्राहक करीत करीत आहेत, असे मंगल जनरल स्टोअर्सचे ताराचंद जैन यांनी सांगितले

आपली प्रतिक्रिया द्या