भिवंडीत उड्डाणपुलाचा भाग कोसळला

सामना ऑनलाईन । भिवंडी

भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुलाचा काही भाग अचानक कोसळल्याने काही काळ खळबळ उडाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. सध्या या पुलावरील दोन्ही बाजुची वाहतूक थांबविण्यात आली आहे.

भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुल हा धोकादायक असल्याचे गेल्या काही दिवसांपासून बोलले जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या पुलाची डागडुजी करणे गरजेचे होते मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा भिवंडीत आले होते त्यावेळी त्यांनी देखील याच पुलावरून प्रवास केला होता, असं सांगण्यात येतं.