Video – कुरखेडा जंगलातील स्फोटात उडवलेल्या वाहनाचे अवशेष हलवले

2

सामना ऑनलाईन । गडचिरोली

गडचिरोलीतील कुरखेडा जंगलात नक्षलवाद्यांनी रस्त्यावर भूसुरुंग पेरून उडवलेल्या वाहनाचे अवशेष उचलण्याचे काम सुरू केले आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, जवान प्रवास करत असलेल्या वाहनाच्या चिंधड्या उडाल्या. हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर गुरुवारी सकाळी राज्याचे पोलीस महासंचालकांनी गडचिरोलीचे पोलीस आधीक्षक, जिल्हाधिकारी, नक्षलवादी विरोधी पथकाचे अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहाणी केली. त्यानंतर दुर्घटनाग्रस्त वाहनाचे वाहनाचे अवशेष उचलण्याचे काम सुरू केले.

गडचिरोलीत सोमवारी मध्यरात्री सशस्त्र नक्षलवाद्यांनी 30 वाहने पेटवून दिली. कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे ही घटना घडली. त्यानंतर वाहने तसेच अन्य यंत्रसामुग्री पेटवून दिली. या आगीत एक कंटनेर लॅब, हायवा ट्रक, डांबर पसरवणारी मशीन, डिझेल आणि पेट्रोल टँकर अशी एकूण 27 वाहने, जनरेटर आणि दोन कार्यालयांचे नुकसान झाले. नक्षलवाद्यांनी केलेल्या जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी 15 जवान खासगी वाहनांतून दुपारच्या सुमारास जात होते. नक्षलवाद्यांना चाहूल लागू नये म्हणून खासगी वाहनांमधून त्यांना नेण्यात येत होते, मात्र नक्षलवाद्यांना याबाबतची माहिती मिळाल्याने त्यांनी रस्त्यात भूसुरुंग पेरून स्फोट घडवला.