बनवा झटपट पास्ता मॅकरोनी सलाड

सामना ऑनलाईन। मुंबई

जेवणात रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर त्याला मॅकरोनी सलाड हे उत्तम पर्याय ठरू शकते. त्यातही रात्रीच्या जेवणात हे सलाड घेणे खुपच फायदेशीर आहे. बाजारात हल्ली विविध आकाराचे मॅकरोनी मिळतात. यामुळे ही डीश खाण्याबरोबरच दिसायलाही आकर्षक असते.

साहीत्य... पास्ता मॅकरोनी २ कप, हिरवा वाटाणा दिड कप, उकळलेले गाजर दीड कप, काकडीचे काप एक कप, बदाम, (भाजलेले) पाव कप, कडीपत्ता एक चमचा, दही २०० ग्रॅम

कृती…एका पॅनमध्ये मॅकरोनी उकळून घ्या. ती शिजल्यावर त्यातील पाणी काढून टाका. दुसऱ्या एका पॅनमध्ये वाटाणा, गाजर शिजवून घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये मॅकरोनी घ्या. त्यात बदाम, वाटाणा, गाजर, दही व काकडीचे काप टाका. सर्व पदार्थ चमच्याने हलवून एकत्र करा. नंतर त्यावर चाट मसाला व कडीपत्ता टाका. झटपट पास्ता मॅकरोनी सलाड तयार.