राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील 118 गांवाचा समावेश

1

सामना ऑनलाईन । कराड

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी पाटण तालुक्यातील एकूण 118 गावातील पाणी पुरवठा योजनांचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत केला आहे. या 118 योजनांच्या कामांकरीता एकूण 23 कोटी 58 लक्ष 14 हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. 2018-19 च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखडयात 79 नवीन नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश करुन या कामांना निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई दिली आहे.

पाटण तालुक्यातील डोंगरी, दुर्गम आणि पठारावरील अनेक गावे व वाडयावस्त्यांमधील नळ पाणी पुरवठा योजना कालबाह्य झाल्या आहेत, तर अनेक ठिकाणी नव्याने करावयाच्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा समावेश हा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत करावा अशी आग्रही मागणी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांना केली होती. राज्य सरकारच्या पाणी पुरवठा विभागाने 2017-18 व 2018-19 असा संयुक्तपणे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचा आराखडा तयार केला होता. त्यामध्ये 2017-18 आर्थिक वर्षात पाटण तालुक्यातील 39 नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. तर 2018-19 आर्थिक वर्षात 79 नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश करण्यात येऊन एकूण 118 योजनांचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत समावेश करण्यात आला आहे. 2018-19 च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखडयात नव्याने 79 नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी मंजुरी दिली आहे. या 118 योजनांच्या कामांकरीता एकूण 23 कोटी 58 लक्ष 14 हजार रुपयांचा निधी मंजुर केला आहे. 2018-19 च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखडयात नव्याने मंजुर करण्यात आलेल्या 79 गावांचा समावेश करण्यात आला आहे.

सातारा जिल्हयात सर्वाधिक 118 योजनांचा आराखडयात समावेश
राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत सातारा जिल्हयातील एकूण 568 एवढया नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश करण्यात आला आहे. तर पाटण तालुक्यातील 118 इतक्या सर्वाधिक नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत झाला आहे.