पाटण्यातील सामायिक जुळ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

7

सामना ऑनलाईन । पाटणा

डोक्याने एकमेकांना जोडलेल्या बिहारमधील सबा आणि फराह या सामायिक जुळ्या तरुणींनी पहिल्यांदाच दोन वेगळे नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावला आहे. हिंदुस्थानच्या इतिहासातील ही अशा प्रकारची पहिलीच घटना आहे.

सबा आणि फराह या 23 वर्षीय सामायिक जुळ्यांनी 2015 मध्ये विधानसभा निवडणूकीत सर्वप्रथम मतदान केले होते. मात्र त्यावेळी त्या दोघींना एकच व्यक्ती म्हणून मतदान कार्ड आले होते. त्यामुळे त्या दोघींना एकत्र मतदान करावे लागले होते. मात्र यंदा त्या दोघींच्या नावाची वेगवेगळी मतदान कार्ड आली असून त्यांनी दोन भिन्न व्यक्ती म्हणून मतदान केले आहे. सबा व फराहने पाटनासाहिब मतदारसंघातून मतदान केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या