इनबॉक्स: पेटीएमची मेसेंजर सेवा

सामना ऑनलाईन । मुंबई

नोटाबंदीनंतर वेगाने मोठी झालेली हिंदुस्थानातील कंपनी म्हणजे पेटीएम. मोबाइलद्वारे सुरक्षित, अचूक आणि झटपट आर्थिक व्यवहाराची हमी देणाऱ्या पेटीएमने इनबॉक्स ही मेसेंजर सेवा सुरू केली आहे. इनबॉक्स या सेवेमुळे पेटीएम वापरणाऱ्यांना त्यांच्या मित्र, नातलग आणि ग्राहकांशी गप्पा मारणे तसेच आर्थिक व्यवहार आणखी सोपे होणार आहे.

पेटीएमचा इनबॉक्स हा मेसेजिंग मंच एंड टू एंड एन्क्रिप्ट असल्यामुळे तुमचा संदेश सुरक्षित राहणार आहे. वापरकर्ते संवाद साधू शकतात आणि गट संभाषण तयार करू शकतात. तसेच फोटो आणि व्हिडियो झटपट पाठवू शकता. थेट लोकेशन शेअर करू शकता. इनबॉक्समधील एका सुविधेमुळे मोबाइलचा कॅमेरा वापरुन महत्त्वाचे क्षण फोटो, व्हिडिओ स्वरुपात साठवू शकता. ‘डिलीट फॉर ऑल’ हा पर्याय वापरकर्त्याला अप्रत्यक्षपणे त्याच्या सर्व संदेशांची आठणव करुन देईल. पेटीएम इनबॉक्स अँड्रॉइड वर उपलब्ध झाले असून लवकरच आयओएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.

मेसेजिंग सेवेव्यतिरिक्त, पेटीम इनबॉक्समध्ये सूचना, ऑर्डर, आणि गेम देखील समाविष्ट आहेत. ‘अधिसूचना’ अंतर्गत, वापरकर्ते सर्व कॅशबॅक ऑफर सर्व श्रेणींमध्ये उपलब्ध असलेली पाहू शकतात. ‘ऑर्डर्स’ अंतर्गत, ते त्यांच्या ऑर्डर आणि व्यवहार यांचे अपडेट पाहू शकतील आणि ‘गेम’ मध्ये क्रिकेट आणि ट्रीव्हिया-आधारित गेम असतील.

पेटीएम इनबॉक्समुळे लाखो वापरकर्त्यांना सहजतेने गप्पा मारता येतील. इंटरफेसद्वारे पैशांची देवाणघेवाण करण्यासह देशभरात मोबाईल पेमेंट इकोसिस्टमची क्रांती करता येईल. स्थानिक रिटेल स्टोअर आणि होम-आधारित उद्योजकांसारख्या लाखो व्यापाऱ्यांनादेखील प्रोत्साहन मिळेल कारण ते आता त्यांच्या ग्राहकांशी संवाद साधू शकतील आणि पेटीएम इकोसिस्टमद्वारे पेमेंट सुरू करू शकतील.