मोरपीस

मोरपीस खूपच शुभ मानले जाते. कारण भगवान श्रीकृष्णांनी ते आपल्या मस्तकावर धारण केले आहे. मोरपिसामुळे दुर्भाग्य नष्ट होते आणि सौभाग्य वाढते म्हणतात. म्हणूनच वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात मोरपिसाचे फायदे वर्णन करण्यात आले आहेत. त्यामुळे घरात योग्य ठिकाणी मोरपीस ठेवले तर त्याचे नक्की फळ मिळू शकते.

> एखादे काम होता होता थांबते… किंवा बराच काळ एखादे काम होतच नसेल तर आपल्या झोपण्याच्या खोलीत पूर्व-पश्चिम दिशेला मोरपीस लावून ठेवा. यामुळे अडकलेली कामे पूर्ण होतील असं म्हटलं जातं. अडकलेला पैसाही यामुळे मिळू शकतो.

> घर किंवा दुकानाच्या दक्षिण-पूर्व दिशेला मोरपीस  लटकावून ठेवल्यास घरातील नकारात्मकता दूर होऊ शकते.

> घराच्या प्रवेशद्वारावर तीन मोरपीस लावून ठेवा. या मोरपिसांच्या खाली श्रीगणेशाचा फोटो किंवा छोटी मूर्ती स्थापित करा. यामुळे वास्तुदोष निघून जातो असंही वास्तुशास्त्र्ाात म्हटले आहे.

> जो मनुष्य नेहमी आपल्याजवळ किमान एखादे तरी मोरपीस ठेवतो त्याला त्याच्या प्रत्येक कामात यश मिळू शकते. आपल्या डायरीत मोरपीस ठेवणेही शुभ मानले जाते.

> एखादा शुभ दिवस पाहून एक मोरपीस घरातल्या अशा ठिकाणी ठेवा, ज्यावर घरात येणाऱया प्रत्येकाची नजर पडू शकेल. यामुळे घरावर आणि घरातील सदस्यांवर कुणाची वाईट नजर पडू शकणार नाही.