रानडुकराच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू, नुकसान भरपाईची मागणी

सामना प्रतिनिधी । जळकोट

रानडुकराच्या हल्यात जखमी झालेल्या शेतमजुराचा दोन महिने मृत्यूशी केलेला संघर्ष संपला आहे. गव्हाण गावातील नामदेव कुंजटवाड गावातील शिवारात शेळ्या चारण्यालाठी गेला असता 30 जून 2018 रोजी त्याच्यावर रानडुकराने हाल्ला केला होता. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या नामदेवचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याने कुंजटवाड परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर कारवाई करून पिडीत कुटुंबाला नुकसान भरवाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

दरम्यान, जळकोट तालुक्यात रानडुकरांचा हैदोस वाढल्याने शेतकरी हैराण असून शेतीच्या नुकसानीबरोबरच जीवितास देखील धोकाही निर्माण झाला आहे. त्यामुळे वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.