ठग्ज ऑफ हिंदोस्तान पाहाल, तर असे बाहेर याल! नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

2

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान यांचा बहुचर्चित ठग्ज ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट या वर्षीचा सर्वात मोठा हिट सिनेमा ठरेल असे वाटले होते. मात्र या चित्रपटाने रसिक प्रेक्षकांची निराशा केली असून त्यामुळे सोशल मीडियावर आमीरने ठगवले अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाला ट्रोल केले जात असून लोकांच्या प्रतिक्रिया फार मजेशीर आहेत.