संदीप वराळ खुन खटल्यातील साक्षीदाराला धमकावणार्‍यास अटक 

1

सामना प्रतिनिधी । नगर 

संदीप वराळ खुन खटल्यातील साक्षीदारास धमकवणार्‍या आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाच्या पथकाने पारनेर तालुक्यातील निघोज फाटा येथे सापळा रचून पकडले आहे. आरोपीमध्ये बबन उर्फ किसन पाटीलबा कवाद (वय 56) असे नाव आहे.

21 जानेवारी 2018 रोजी निघोज येथे संदीप वराळ यांचा खुन झाला होता. सदर गुन्ह्यातील साक्षीदार सुनिता विजय उचाळे (वय 35) यांचा 9 डिसेंबर 2018 रोजी तिच्या राहत्या घरी येऊन बादगे नावाचे बाईने संदीप वराळ खुन खटल्यातील जामीनावर सुटलेला आरेापी बबन कवाद याच्या सांगण्यावरुन साक्षीदारास सदर गुन्ह्यास साक्ष देऊ नकोस तु जर साक्ष दिली तर तुझ्या कुटुंबाचे बरे वाईट होईल असा दम दिला होता. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाकडे देण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिले होते. आरोपी कवाद हा देवी भोयरे फाटा निघोज येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला सापाळा रचून पकडले.

पोलीस निरिक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश नळे, विजय वेठेकर, योगेश गोसावी, रविंद्र कर्डिले, रवि सोनटक्के, विजय ठोंबरे, दिपक शिंदे, विजय धनेधर, संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.