शहिद जवान लक्ष्मीकांत भुरे यांच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी जमली गर्दी 

82

सामना प्रतिनिधी । बुलढाणा 

बुलढाण्यातील लक्ष्मीनगर येथील आर्मी पोस्टल सर्व्हीसमध्ये वारंट ऑफिसर म्हणून सेवेत असलेले लक्ष्मीकांत माधवराव भुरे यांचे लेह लद्दाख मध्ये रुममध्ये असताना हिटरचा स्फोट होऊन ते शहीद झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. आज त्यांचा अस्थीकलश बुलढाण्यात त्यांचे मोठे बंधु दत्तात्रय भुरे यांनी आणला. त्यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात बुलढाण्यातील नागरिकांनी त्यांच्या नातेवाईकांनी व बुलढाण्याचे तहसिलदार सुरेश बगळे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, बुलढाणा फोटोग्राफर असोशिएशनचे सभासद, शहरातील पत्रकार बांधव यांनी आदरांजली वाहिली व आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या