आरे कॉलनीमधील हजारो झाडे वाचविण्यासाठी लाखो माणसे एकवटली

सामना ऑनलाईन । मुंबई

मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे. ही झाडे वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी केलेल्या ऑनलाईन याचिकेवर लाखो नागरिकांनी साईन केले आहे.

मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ मेट्रो-३ चा कार डेपो आरे कॉलनीत उभारणार आहे. त्यासाठी हजारो झाडांवर कुऱहाड चालणार आहे. आधीच प्रदूषण वाढत असताना मुंबईचा उरलासुरला ऑक्सिजनही तोडला जाणार आहे. पर्यावरणप्रेमींनी त्याला जोरदार विरोध केला आहे. मेट्रोच्या या वृक्षतोडीविरुद्ध पर्यावरणप्रेमी ऑनलाईन याचिकेद्वारे नागरिकांचा पाठिंबा मिळवत आहेत. आतापर्यंत १ लाख १९ हजारांवर नागरिकांनी ही याचिका साईन केली आहे.

आरेचा निसर्ग वाचवण्यासाठी संगीतकार निराली कार्तिक यांनी ‘चेंज डॉट ऑर्ग’ या वेबसाईटवरून ही ऑनलाईन याचिका मोहीम छेडली आहे.

३५०० झाडांची कत्तल
आरेतील प्रस्तावित कार डेपोसाठी साडेतीन हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे. ते टाळण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा विचार करून मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा निवडावी. ‘निरी’ आणि ‘आयआयटी’मधील तज्ञांनी कांजुरमार्ग, बॅकबे आणि कालिना येथील पर्यायी जागाही त्यासाठी सुचवल्या आहेत. आरेमधील झाडे तोडली गेली तर भविष्यात त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असे याचिकेत म्हटले आहे.

महापौरांनी केली पाहणी

‘मेट्रो’ कारशेडसाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. या ठिकाणी पुनर्रोपित केलेले हजारो वृक्ष अक्षरशः सुकून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह सर्वपक्षीय गटनेत्यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी उपमहापौर हेमांगी करळीकर, सभागृह नेते यशवंत जाधव, किरोधी पक्षनेते रकी राजा, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगाककर, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, बाजार क उद्याने समिती अध्यक्षा सान्की तांडेल आदी उपस्थित होते.